सातारा:-महाबळेश्वर तालुक्यातील चिखली शाळेचा मीत जाधवचा जिल्ह्यात वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर तालुक्यातील चिखली शाळेचा मीत जाधवचा जिल्ह्यात वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक.

सातारा:- छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे संपन्न झालेल्या “सातारा जिल्हास्तरीय विद्यार्थी दिन” वक्तृत्व स्पर्धेत महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील विद्यार्थी कुमार मीत विजय जाधव याने संपूर्ण जिल्ह्यात 2300 शाळांतून वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला असून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
गेली सलग पाच वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलीचे विद्यार्थी या स्पर्धेत तालुकास्तरीय स्पर्धेतून जिल्हा स्तरावर सहभागी होत होते, पण यश हुलकावणी देत होते. परंतु या वर्षी मीत जाधव याच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्याला प्रथमच या जिल्हा स्तरावर स्पर्धेत यश प्राप्त झाले आहे. त्याबद्दल मीत जाधव व मार्गदर्शक प्राथमिक शिक्षक विष्णू ढेबे यांचे सातारा जिल्हा परिषद साताऱ्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, पत्रकार सुरेंद्र जाधव,गटविकास अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समिती सभापती, ग्रामस्थ, अधिकारी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.




