कराड:-कालगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
कालगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान.
कराड: पुंडलिक वरदेव हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री कालभैरव जोगूबाईमाता की जय च्या जयघोषात अत्यंत भक्तीपूर्वक वातावरणात श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र कालगाव (ता.कराड ) येथील कृष्णा नदी तीरी असलेल्या जागृत स्वयंभू श्री कालभैरवनाथ जोगूबाई मातेच्या चरणस्पर्शाचे पुजन झाले. श्री कालभैरवनाथ भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ ग्रामस्थ कालगाव यांच्या उपस्थितीत श्री कालभैरव मंदिर व विठ्ठल मंदिर येथून श्रीक्षेत्र कालगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान भक्ती पूर्वक वातावरणात झाले. सदर दिंडी सोहळ्याचे हे १५ वे वर्ष आहे श्री कालभैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे श्री तुकाई देवीपायी दिंडी तुकाईची वाडी तालुका जिल्हा सातारा श्री ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी नवीन कवठे तालुका कराड श्री भैरवनाथ पायी दिंडी चोपडी तालुका पाटण या सहभागी होणार आहेत या दिंडी सोहळ्यातील रात्रीचे मुक्काम माऊली कृषी सेवा केंद्र अंतवडी मसूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर चोराडे तालुका खटाव श्री अशोक जगन्नाथ गुरव राहणार मायणी यांच्या निवासस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विभुतेवाडी तालुका आटपाडी श्री खंडोबा पिंजारी माता मंदिर दिघंची श्री अजय जडगे महूद जिल्हा सोलापूर यांचे निवासस्थान श्री महादेव मंदिर कोर्टी जिल्हा सोलापूर अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा मठ श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मुक्काम होणार आहे तसेच दिंडीची सांगता श्री कालभैरवनाथ जोगबाई मंदिरात श्रीक्षेत्र कालगाव तालुका कराड येथे काल्याचे किर्तन व महाप्रसाद श्री सुधाकर भिकू चव्हाण यांच्यातर्फे देण्यात येणार आहे संपूर्ण दिंडी सोहळ्यात मोफत आरोग्य सेवा डॉक्टर देसाई मसूर हे देणार आहेत अशी माहिती संयोजक काल भैरवनाथ भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ ग्रामस्थ श्रीक्षेत्र कालगाव यांनी दिली.