कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-सफाई कामगारांना साहित्य न देणाऱ्या ठेकेदाराचे बिल थांबून ठेवण्याची सूचना…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सफाई कामगारांना साहित्य न देणाऱ्या ठेकेदाराचे बिल थांबून ठेवण्याची सूचना…

सातारा दि: सातारा जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष श्री एम व्यकटेशन यांनी साताऱ्या जिल्हा नियोजन भवन मध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. यावेळी सफाई कामगारांना साहित्य न देणाऱ्या ठेकेदारांची बिलं थांबून ठेवण्याची सूचना करण्यात आली. त्याचे टाळ्या वाजवून सफाई कामगार प्रतिनिधी व संघटनेने स्वागत केले आहे.

सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सफाई कामगार व कंत्राटी कामगार यांच्या शोषणाबाबत पश्चिम भारत मजदूर अधिकार व सफाई कामगार संघटना यांनी निवेदन दिले. राष्ट्रीय सफाई कामगार आयोग अध्यक्ष श्री एम वेंकटेशन व आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे विकी खोकर संजय सोलंकी अमित सोळुंके सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, यांच्यासह मान्यवरांनी सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत जागरूकता दाखवली. सातारा जिल्हा नियोजन मंडळात झालेल्या या बैठकीला सातारा जिल्ह्यातील नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेचे मुख्यधिकारी, सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच भाजप अनुसूचित जाती सेलचे राज्य उपाध्यक्ष राजू जेधे, मनोज सोळुंके, गणेश वाघमारे, विकी खोकर संजय सोलंकी अमित सोलंकी, अशोक मारूडा पवन टाक, सुरज सोलंकी, अमित भिसे यांच्यासह अनेक सफाई कामगार संघटनेची संलग्न कर्मचारी उपस्थित होते.
कंत्राटी सफाई कर्मचारी यांना किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित रोजगाराच्या वर्गातील कामगार किमान वेतन देत असल्याची तपासणी करणे. या बाबत शासन निर्णय परिपत्रक ७ डिसेंबर१९२३ रोजी जारी करण्यात आली आहे. परंतु, त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावली होत नाही. कंत्राटी कामगार सफाई कामगार यांच्या नावावर बँक खाते काढले जातात. त्यांची ए.टी.एम. कार्ड हे संबंधित ठेकेदार स्वतःकडे ठेवून दर महिन्याला ए.टी.एम. मध्ये जमा झालेले रक्कम काढून कमी असलेली रक्कम सफाई कामगारांकडे देतात. एवढेच नव्हे तर भविष्य निर्वाह निधी सुद्धा देत नाहीत. सुरक्षा साधने देत नाहीत. संबंधित ठेकेदारांनी सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधने न दिली तरी त्या ठेकेदारांची बिले अदा केली जातात. सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचे घरकुल मिळावे. त्यांच्या स्वच्छतेबाबत व सफाई कामगारांना जी स्वच्छता निरीक्षक आहेत. त्यांना माणुसकीची वागणूक मिळावी. या व इतर प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.
सफाई कामगार प्रश्न बाबत अध्यक्ष श्री.एम. व्यंकटेशन यांनी सर्व प्रश्न समजून घेतले व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत येथील मुख्य अधिकारी तसेच कामगार व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
—————————————————–
फोटो -केंद्रीय सफाई कामगार आयोग अध्यक्ष श्री एम व्यंकटेशन यांचा सत्कार करताना सातारा जिल्हा अधिकारी व आयोग अध्यक्ष यांना निवेदन देताना गणेश वाघमारे व राजू जेधे (छाया- अजित जगताप, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button