ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश.

वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा ऐतिहासिक निर्णय — ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाई दि 9 — राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वाई धुडिविनायक मंदिरासमोरील कृष्णाबाई संस्थान घाट येथे भाजपाच्या मुलाखती व पक्ष प्रवेश मेळाव्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा प्रभारी धैर्यशील दादा कदम ,माजी आमदार मदनदादा भोसले,सुनील काटकर, महिला जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले-चव्हाण, जयकुमार शिंदे , दिपक ननावरे, रोहिदास पिसाळ,
काशिनाथ शेलार, सचिन घाटगे ,सौ प्रतिभा शिंदे तसेच वाई व सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
वाई शहराच्या विकासासाठी अनिल सावंत यांचा प्रवेश महत्त्वाचा असुन
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले अनिल सावंत हे वाई शहरातील विकासकामांमध्ये सातत्याने पुढाकार घेणारे नेतृत्व आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद निश्चितच वाढेल. वाई शहराचा विकास, पर्यटन वृद्धी आणि अर्बन डेव्हलपमेंटसाठी आवश्यक निधी आम्ही केंद्र व राज्य सरकारकडून मिळवून देऊ. तुम्ही आता काळजी करू नका वाईकरांच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही. ते पुढे म्हणाले गटर आणि रस्ता म्हणजेच विकास नव्हे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. वाई मांढरदेव व सुरूर वाई पोलादपूर रस्त्यांचे प्रलंबित काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच महाबळेश्वरकडे पर्यटन वाढीसाठी पसरणी घाटात पर्यायी रस्ता उभारण्यात येईल शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले की, सध्या वाई नगरपरिषद क वर्गामध्ये असून ती ब वर्गात आणण्यासाठी व हद्दवाढ करणेसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. “राज्याचा झालेला भरीव विकास हा फक्त भाजप सरकारच्या काळातच झाला आहे अनिल सावंत यांचा पक्ष प्रवेश वाई शहराला दिशा देणारा ठरेल असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीत घुसमट होत होती, विकासासाठी भाजपमध्ये आलो असे अनिल सावंत मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्यासारख्या नेतृत्वाची घुसमट होत होती, त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश केला. माझा एकमेव ध्यास वाई शहराचा सर्वांगीण विकास हा आहे. शहराची हद्दवाढ कृष्णा नदी स्वच्छता, सांडपाणी योजना, शिक्षणवाढ आणि रोजगार निर्मितीसाठी मी पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करीन. शौचालये व गटारे हा विकासाचा अजेंडा नव्हे, तरुणांना रोजगार मिळावा हे माझे ध्येय आहे. ते पुढे म्हणाले, वाई शहरातील खाजगी शाळांच्या वाढत्या फी, अभ्यासिका आणि इन्स्टिट्यूट स्थापनेसाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. अर्बन डेव्हलपमेंटद्वारे वाई शहराचे रूपांतर करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सक्रिय भूमिका घेईन.
माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम वाईकरांसाठी दिशा देणारा निर्णय असे म्हणाले, “वाई शहराचा विकास आणि पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अनिल सावंत यांचे नेतृत्व उपयोगी ठरेल. पक्षात आलेल्या या नेतृत्वामुळे वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचाच नगराध्यक्ष निवडून येईल यात शंका नाही मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात सुनील तात्या काटकर, जयकुमार शिंदे, सुरभी भोसले, सरीता सावंत भोसले, दीपक ननावरे, रोहिदास पिसाळ, सचिन घाटगे, प्रशांत तेजस जमदाडे, सागर पवार, अमित वनारसे, संदीप घोरपडे, प्रशांत नागपूरकर, अजित वनारसे, अविनाश फरांदे, वसंत शिंदे, मिलिंद खामकर, काशिनाथ शेलार, सचिन गांधी, तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांनी केले, तर आभार अमित वनारसे यांनी मानले. या वेळी अनिल सावंत, सौ‌.सरिता सावंत यांचेसह संग्राम सपकाळ, प्रकाश जाधव, जमीर बागवान, मंगेश सावंत, केदार काटे, गणेश पवार, संदीप पावशे, सचिन सावंत, लक्ष्मण सावंत ,निलेश वाडकर, संदीप घोरपडे ,मनोज निंबाळकर, अमित वाघ, सचिन पेटकर ,प्रवीण जाधव,आदी शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झालेले त्यांचा सन्मान करण्यात आला. वाई शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button