पारनेर:-सुपा परिसरात बिबट्या जेरबंद – आमदार दाते यांनी केली समक्ष पाहणी.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सुपा परिसरात बिबट्या जेरबंद – आमदार दाते यांनी केली समक्ष पाहणी.

सुपा व परिसरात निर्माण झालेल्या बिबट्याच्या दहशतीला आळा घालण्याच्या प्रयत्नांत वनविभागाला आज सकाळी मोठे यश मिळाले. जांभळवाडी ओढ्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यात आज एक बिबट्या जेरबंद झाला.
> या प्रसंगी आमदार काशिनाथ दाते सर यांनी घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी केली व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “एक बिबट्या पकडला गेला असला तरी परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त न राहता खबरदारी घ्यावी.”
वनविभागाचे प्रयत्न व स्थानिकांच्या सहकार्यामुळे हा धोका काही प्रमाणात कमी झाला असला तरी सुरक्षिततेसाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे आमदार दाते यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी सरपंच योगेश रोकडे, सागर मैड, अमोल मैड यांसह स्थानिक कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




