मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल पंधरवडा तसेच पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४’ चा आज शुभारंभ.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
मुंबई दि. 1
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल पंधरवडा तसेच पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४’ चा आज शुभारंभ झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अपर मुख्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते. तर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.
कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांनी समन्वयाने एकत्र येऊन काम करावे, नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबतच जनकल्याणकारी योजना जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमुख काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.
जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहोचून शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहून चांगले काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच महसूल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवड्याच्या आयोजनास मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये राज्यातील दूध भेसळीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर अतिशय कठोरपणे काम करुन भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल, अशी कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
पंधरवडानिमित्त सर्व विभाग एकत्र येऊन काम करत असले तरी सरकार नेहमीच नागरिकांसाठी 24×7 काम करीत आहे. आपण या योजना लोकांपर्यंत पोहोचवून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.