आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-(कळंबे)-सामाजिक सर्वेक्षण व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना -शहिद शशिकांत शिवथरे सांस्कृतिक भवन कळंभे येथे संपन्न.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

जाहीर ग्रामसभा

वाई:-(कळंबे)-सामाजिक सर्वेक्षण व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना -शहिद शशिकांत शिवथरे सांस्कृतिक भवन कळंभे येथे संपन्न.

सामाजिक सर्वेक्षण व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना.

मौजे कळंभे ता. वाई जि. सातारा येथील महाराष्ट्र शासन व तहसील कार्यालय वाई यांचे सुचनेनुसार ग्रामपंचायत कळंभे यांची सामाजिक सर्वेक्षण(संजय गांधी निराधार पेन्शन योजना अपंग,परीतक्त्या,श्रावणबाळ पेन्शन योजना)या विषयावर विशेष ग्रामसभा आज बुधवार दिनांक-१०/७/२०२४ रोजी शहिद शशिकांत शिवथरे सांस्कृतिक भवन कळंभे येथे संपन्न झाली. सदरील ग्रामसभेला, ग्रामपंचायत कळंभे यांचे वतीने गावातील असणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, अपंग पेन्शन योजना परितक्या पेन्शन योजना,आजार पिडीत पेन्शन योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना लाभार्थी तसेच आजपर्यंत वंचित असणारे वरील पेन्शन योजना मधील लाभार्थी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना याविषयी जनजागृती व यापुर्वी पेन्शन सुरू असणाऱ्या व जनजागृती करता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आलेले होती सदरी ग्रामसभेमध्ये संपुर्ण महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे सर्वेक्षण व आँडीट करणारी समितीचे अधिकारी सौ.संध्या वानखेडे मँडम,सौ.वृषाली नाथे मँडम ,तहसील कार्यालय वाई यांचे निराधार पेन्शन योजना नायब तहसीलदार अधिकारी व कर्मचारी, मे. तलाठी श्री.विक्रम पाटील, ग्रामसेवक श्री.अनिल प्रभुणे, सरपंच सौ निलम शिवथरे, उपसरपंच श्री आबाजी सुतार, आदर्श सरपंच सौ ज्योती गायकवाड, माजी सरपंच सौ सारीका गायकवाड,भावी उपसरपंच सौ शकुंतला चव्हाण,ग्रामसभेच्या अध्यक्षा(लाभार्थी) उज्वला ज्ञानेश्वर शिवथरे,माजी उपसरपंच श्री प्रकाश बाबर, ग्रा.प.सदस्य श्री संभाजी गायकवाड,वि.का.स.सेवा सोसायटी चेअरमन श्री विश्वनाथ शिवथरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.आश्वीनी वाघ, अंगणवाडी-मदतनीस सेविका सौ.दिपाली शिवथरे,सौ.दिपाली नलवडे,सौ.विद्या शिवथरे,पोलीस पाटील सौ.जयश्री शिवथरे,कोतवाल सौ.भाग्यश्री वेदपाठक,आशाताई सौ.साधना गायकवाड, सीआरपी सौ.नुतन बाबर,कृषीसखी सौ.उल्का शिवथरे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे महिला अध्यक्षा सौ.सीमा जाधव,निराधार पेन्शन योजना चे सर्व पात्र व वंचित लाभार्थी, शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते.सदरी ग्रामसभेला सामाजिक सर्वेक्षण या विषयावर संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले व सुचना केल्या . त्याबद्दल अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ बंधू-भगिनी या सर्वाचे हार्दिक हार्दिक आभार.ग्रामपंचायत कळंभे यांचे वतीने सदरील समितीच्या सदस्यांचा/अधिकारी,कर्मचारी यांचा बहुमोल सहकार्याबद्दल शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ-सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेकामी पात्र लाभार्थी यांना अंगणवाडी सेविका सौ.दिपाली शिवथरे,सौ.दिपाली नलवडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच सदरील शासकीय समिती कळंभे गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून मुक्कामी गावांमध्ये होती.त्यांना गावांमध्ये तात्पुरते राहणेकरीता/वास्तव्याकरीता निवासाची सोय करून देणारे दानशुर व्यक्तीत्व श्री.बाबासो रामचंद्र शिवथरे यांचे ग्रामपंचायत कळंभे चे वतीने आभार.
त्याचबरोबर सदरील समितीस दररोज भोजन व्यवस्था करणारे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका- मदतनीस, आशाताई, शिपाई,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,लाभार्थी यांचे देखिल सदरील समितीने आभार व्यक्त केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button