खटाव:-भैरवनाथ विद्यालय चोराडे मधील विद्यार्थ्यांना डॉ.सचिन मोहिते यांच्या कडून अनोखी ग्रंथ भेट.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा
पुसेसावळी:-भैरवनाथ विद्यालय चोराडे मधील विद्यार्थ्यांना डॉ.सचिन मोहिते यांच्या कडून अनोखी ग्रंथ भेट.
वडीलांच्या स्मरणार्थ स्तुत्य उपक्रम!
कै.बजरंग विठोबा मोहिते यांच्या स्मरणार्थ डॉ.सचिन बजरंग मोहिते. यांच्याकडून श्री भैरवनाथ विद्यालय चोराडे शाळेस अनोखी ग्रंथ भेट देण्यात आली. डॉ.सचिन मोहिते हे सध्या मुंबईत राहतात. पण गावाकडच्या विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन मिळावे. तसेच समाज कार्याची ओढ आणि आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या प्रेरणेने ही अनोखी ग्रंथ भेट देण्यात आले.
गावातील विद्यार्थीचां वैचारिक दृष्टिकोन प्रबळ व कृतिशील व्हावा.
आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गावाकडचा विद्यार्थी सक्षम व्हावा.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छेसारखं पुढील आयुष्य जगाव.”वाचाल तर वाचाल”असा संदेश देत त्यांनी कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त केलं.
तसेच चोराडे गावचे विकास सर यांनी सुद्धा इंग्रजी भाषा व टेक्नॉलॉजी आणि मोटिवेशन देऊन मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम चोराडे गावचे उपसरपंच श्री.मा.सुधाकर कुंभार तसेच श्री.भैरवनाथ विद्यालय चोराडे, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी याच्या समावेश मध्ये पार पडला.