लोणंद:-खंडाळा तहसिल कार्यालय तसेच सेतू विभाग यांच्या भ्रष्टचाराबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. पुरुषोत्तम जाधव साहेब यांना लेखी निवेदन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
खंडाळा तहसिल कार्यालय तसेच सेतू विभाग यांच्या भ्रष्टचाराबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. पुरुषोत्तम जाधव साहेब यांना लेखी निवेदन.
लोणंद – दिनांक 09/01/2024 रोजी मौजे बावकलवडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. पुरुषोत्तम जाधव साहेब यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रचंड प्रमाणात शिवसैनिक हजर होते.
त्यावेळी माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुनीलकुमार बावधनकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. पुरुषोत्तम जाधव साहेब यांना समक्ष भेटून त्या ठिकाणी खंडाळा तहसिल कार्यालयात होणाऱ्या अधिकाऱ्यांचा तसेच नागरी सुविधा केंद्र सेतू मधील ऑपरेटर यांच्या भ्रष्टाचाराबाबत समक्ष भेटून निवेदन दिले आहे. यापूर्वी दि. 08/01/2024 रोजी उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडे या प्रकरणाबाबत सुनावणी झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये मा. श्री. मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या शासनामध्ये आपल्या जिल्ह्यात तथा तालुक्यामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही व यासंदर्भात आपण लवकर च कडक शासन करू असे आश्वासन श्री. पुरुषोत्तम जाधव साहेब यांनी दिले आहे.