आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-यमुनानगर रूग्णालयात 100 खाटांची प्रा. उत्तम केंदळे यांची आयुक्तांकडे मागणी.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

यमुनानगर रूग्णालयात 100 खाटांची
प्रा. उत्तम केंदळे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, दि. 17 (शफिक शेख) :- यमुनानगर रूग्णालयाच्या परिसरातील नागरिकांची वाढती लोकसंख्या आणि वायसीएम हॉस्पिटलवरील रूग्णांचा वाढता ताण पाहता यशवंतराव चव्हाण मेमोरियल दवाखान्याच्या धर्तीवर यमुना नगर दवाखाना १०० बेडचे/खाटांचा दवाखाना, तसेच अतिदक्षता विभाग (I.C.U) विभागाची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी प्रा. केंदळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
निगडी प्रभाग क्र. १३ मधील से. क्र. २२ या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयातील मोकळ्या जागेत प्रशस्त रुग्णालय व्हावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु, अपुऱ्या निधी अभावी अद्यापही रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पालिका प्रशासनाकडे रुग्णालय विस्तारीकरणा संदर्भातील पत्र देत दि.२६/१०/२०२१ रोजी मागणी केली होती. आपण कंपन्यांच्या सीएसआर फंडातून दवाखान्यात तात्पुरत्या स्वरूपाची विकास कामे करीत सहकार्य केले आहे. या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयात महिला प्रसूतिगृह, ओपीडी तसेच अनेक उपचार होत असतात. रुपीनगर, तळवडे, सेक्टर नं.२२, निगडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर, कृष्णानगर, सहयोगनगर या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांनी सुद्धा प्रशासनाकडे यमुनानगर रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. सदर दवाखान्यातील वाढती गर्दी पाहता सध्याची इमारत अपुरी पडत आहे.
या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी कोणतेही शासकीय रुग्णालय नाही. रात्री-अपरात्री नागरिकांना अत्यावश्यक परिस्थिती उद्भवल्यास पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात जावे लागते. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल दवाखान्याच्या धर्तीवर यमुना नगर दवाखाना १०० बेडचे/खाटांचा दवाखाना, तसेच अतिदक्षता विभाग (I.C.U) करण्याची गरज निर्माण झाली आहे. या अति आवश्यक बाबीबाबत सकारात्मक विचार करून या आर्थिक वर्षात यमुनानगर रुग्णालयासाठी अंदाजपत्रकीय रक्कम व तरतूदीचा समावेश करण्यात यावा व रुग्णालयाच्या निर्मितीबाबत योग्य ते पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी मा.नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button