वैजापूर:-दि वैजापुर मर्चन्टस् को-ऑप.बँक लि., वैजापुर बँकेचे भागभांडवलदार व ग्राहक यांच्या अतुट विश्वासामुळे प्रगतीचा गाठला आलेख.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वैजापूर:-दि वैजापुर मर्चन्टस् को-ऑप.बँक लि., वैजापुर बँकेचे भागभांडवलदार व ग्राहक यांच्या अतुट विश्वासामुळे प्रगतीचा गाठला आलेख.

दि वैजापुर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., वैजापुर बँकेचे भागभांडवलदार व ग्राहक यांच्या अतुट विश्वासामुळे प्रगतीचा आलेख गाठला असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन मा.श्री. रविंद्र उर्फ बाळासाहेब बन्सीलालजी संचेती यांनी केले,
बँकेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (१३) रोजी कृष्णा लॉन्स् मार्केट यार्ड येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली. या सभेला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन सभेस सुरुवात करण्यांत आली. बँकेचे चेअरमन, मा.श्री. रविंद्र उर्फ बाळासाहेब बन्सीलालजी संचेती यांनी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असुन बँकेकडे रु.५४० कोटी ठेवी आहे. तसेच बँकेची गुंतवणुक रु.१९० कोटी आहे. बँकेच्या माध्यमातुन आजपर्यंत 140 पेक्षा जास्त गरजु तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे. तसेच बँकेमार्फत कर्जदार व सभासदांसाठी अपघात विमा योजना लागु केल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
या बैठकीत सभासदांसमोर रविंद्र उर्फ बाळासाहेब बन्सीलालजी संचेती यांनी दि.३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. यासह मांडलेल्या १ ते १६ विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली.
या सभेला मंचावर मा. नगराध्यक्ष डॉ. दिनेशसिंह परदेशी, बँकेचे उपाध्यक्ष उल्हास ठोंबरे, अॅड. प्रमोद जगताप विशालजी संचेती, प्रितमजी मुथा, विनयजी सुराणा, सुरेशजी तांबे, विजयजी वेद, विजयजी दायमा, सावनसिंगजी राजपुत, महेंद्रजी गुंदेचा, विनोदजी गायकवाड, मनोजजी छाजेड, सौरवजी संचेती, प्रशांतराव त्रिभुवन, प्रकाशज पिरथाणी, अंकीतजी मालपाणी, सौ. शालीनीजी सोमाणी, सौ. वैशालीजी साखरे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थि होती.
सभेचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ए. एम. कोठारी यांनी केले. सुत्रसंचालन सावनसिंगजी राज यांनी केले तसेच आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. तांबे यांनी केले.
वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वितेसाठी बँकेचे शाखाधिकारी, व्हि. डब्ल्यु. कोरडे, एस.जे. साकला, सी.एम.आ आर.ई.फल्ले, सौ.एस.ए.लाहोटी, आर.एन. साळवे, सि.व्हि.शर्मा, एस. आर. सोनवणे, एस.एस. जगताप व कर्मचारी वृंदांनी पुढाकार घेतला.




