ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा नागठाणे:-स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.
नागठाणे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे रामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे ता.जी .सातारा या विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली या मध्ये विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत काढलेला चित्ररथ आकर्षक ठरला स्वामी विवेकानंद व बापुजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी केले व स्वामी विवेकानंद व बापूजी साळुंखे यांच्या नावाने जयजयकार करत त्यांच्या विचारांची मिरवणूक नागठाणे गावातुन काढण्यात आली ट्रॅक्टर मध्ये आकर्षक सजावट करून ढोल ताशा झांज च्या गजरात विद्यार्थी व सर्व स्टाफ यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता पालक ग्रामस्थ यांनी या मिरवणुकीला प्रतिसाद दिला