ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनचे अग्रोदय महाअधिवेशन उद्यापासून.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनचे
अग्रोदय महाअधिवेशन उद्यापासून.
पुणे, दि. 23 (शफिक शेख) :- अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनच्यावतीने संपूर्ण भारतातील विविध राज्यांतील अग्रवालांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज ग्राऊड, येरवडा येथे 24 ते 25 डिसेंबर दरम्यान अग्रोदय महाअधिवेशनचे आयोजन करण्यात आले आहे. ते उद्यापासून सुरु होत आहे, अशी माहिती अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोपाल शरण गर्ग, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनूप गुप्ता, राजेश अग्रवाल, गोपाल गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार असून यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे आदी उपस्थित राहणार आहे. तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर, पदमिनी कोल्हापुरे, कृष्णकुमार गोयल, जयप्रकाश गोयल, इश्वरचंद गोयल, सुनिल अग्रवाल, नितीन अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. मोटिवेशनल स्पीकर डॉ उज्जवल पाटनी हे यावेळी मार्गदर्शन करणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्रांतीय अधिवेशन 2022 अंतर्गत शनिवार 24 डिसेंबर 2022 रोजी महिला अधिवेशन, युवक अधिवेशन, व्यवसाय अधिवेशन, व्यापार / उद्योग भव्य प्रदर्शन, अग्रवाल गॉट टॅलेंट एंटरटेनमेंट आणि रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी मुख्य प्रांतीय महाअधिवेशन व अग्र पुरस्कारांचे वितरण+ सामाजिक खुला मंच (चर्चा सत्र) होणार आहे.
विविध बँका/वित्तीय संस्थांकडून व्यवसाय/व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देणे, विविध यशस्वी अग्रवाल व्यावसायिकांशी चर्चा सत्रे, आधुनिक यशस्वी व्यवसाय पद्धतींची माहिती देणे आणि अग्रवालांमधील व्यवसाय वाढवणे, या सर्व विषयांवर युवा संमेलनात चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अग्र गरिमा सन्मान, अग्र माता माधवी सन्मान, आगर युवारत्न गौरव सन्मान, अग्र श्रद्धासुमन सन्मान, अग्र मनिषी सन्मान आणि अग्र चिरायू सन्मान विविध श्रेणींमध्ये अग्रगण्य पुरस्कारांचे वितरण या संमेलनात होणार आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button