खटाव:-कालकथित पवन जगताप यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बौद्ध संस्कार पाठ पुस्तकाचे वितरण.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
कालकथित पवन जगताप यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बौद्ध संस्कार पाठ पुस्तकाचे वितरण.
वडूज दि: सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी. आर. जगताप यांचे एकुलता एक पुत्र पवन जगताप यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त वडूज ता. खटाव या ठिकाणी बौद्ध बांधवांना बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर व बुधिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा यांनी हे पुस्तक उपलब्ध केले. सातारा जिल्ह्यातील बौद्ध बांधवांना हे पुस्तक उपलब्ध व्हावे यासाठी त्याचे मोफत वितरण करण्यात आले असून सातारा जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी देणगी देऊन हे पुस्तक मोफत वितरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विविध संस्था तसेच व्यक्तींनी यासाठी देणगी दिली असून खटाव तालुक्यातील बी. आर. जगताप, विश्वास जगताप, अरुण रणदिवे, संदेश वाघमारे आदींनी तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भरगोस स्वरूपात देणगी देऊन या बौद्ध जीवन संस्कार पाठ हे पुस्तक आपल्या बांधवांना मोफत मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संघटनेचे अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय महासचिव जगदीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या पुस्तकाचे वितरित करण्यात येत असून मुद्रक बुद्धभूषण भीमराव यशवंत आंबेडकर यांनी आतापर्यंत या पुस्तकाच्या सतरा आवृत्ती काढण्यात आलेले आहेत. मराठी भाषेमध्ये असलेल्या या पुस्तकांमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व बौद्ध गाथांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरच्या पुस्तकांमध्ये संस्कार विधी विभाग तसेच विवाह विधी, साक्षगंधविधी, विद्या आरंभ विधी, पुण्यानुमोदन, अंतिम संस्कार, भूमिपूजन, गृहप्रवेश, उद्घाघाटन, मूर्ती प्रतिष्ठापना, वाढदिवस विधी साहित्याची व इतर सूचना यांचा समावेश करण्यात आला आहे. बौद्धचार्यकुमार सरतापे यांनी सर्व विधी पार पाडला.
आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध समाज हा इतर समाजाला ही सोबत घेऊन वंचित बहुजन मार्गक्रमण करत आहे. या पुस्तकांमध्ये बुद्ध- धम्म- संघ- वंदना, परित्राण पाठ, महामंगल सुत, सबसुख गाथा, धम्मपालन गाथा, आशीर्वाद, त्रिसरण, पंचशील, भीमस्मरण, बुद्ध पूजा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कालकथित पवन जगताप यांना यावेळी अभिवादन करण्यासाठी सर्वश्री अशोक बैले, मनोहर नलावडे, विश्वास जगताप ,अजित नलावडे ,शैलेंद्र वाघमारे, बापू गायकवाड, पत्रकार अजित जगताप, जयवंत गोडसे, उत्तम म्हस्के, बाजीराव आवळे गुरुजी, उमा झेंडे, सुनील झेंडे, सुनिल मिसाळ, महादेव भोकरे, कुदळे, श्रीमती कविता वाघमारे, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील बौद्ध बांधव आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम तसेच पुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी अरुण रणदिवे, नितीन सावंत, जीवन तडाखे, महावीर किर्तीकर, संदिप जगताप, ॲड. अनिल गोडसे, जयवंत गोडसे, विकास वायदंडे, पल्लवी व प्रतिमा, सावित्री जगताप, मिलिंद निकाळजे, सोमनाथ आवळे व वडूज नगरीतील राजकीय, सामाजिक शैक्षणिक कार्यात पुढाकार घेणारे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या धार्मिक कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( निकाळजे गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( गवई गट) व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————–++—————————————-
फोटो— पवन जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त बौद्ध जीवन संस्कार पाठ पुस्तकाचे वितरण करताना अजित जगताप अशोक बैले (छाया- सुरज जगताप वडूज)