कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यार्थिनीसाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’ संपन्न
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड :-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यार्थिनीसाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’ संपन्न.
कराड : ( दि. 24 एप्रिल, प्रतिनिधी) “आजच्या युगात स्वसंरक्षणाबरोबरच स्वतःच्या मेंदूचे आणि सोशल मीडिया पासून स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे कारण सोशल मीडिया जरी उपयोगी असला तरी तो एक राक्षस आहे म्हणून त्यापासून स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे. प्रसंग बघून ही स्वसंरक्षण करता आले पाहिजे. महिलांनी नेहमी सोशल मीडियापासून सावध राहिले पाहिजे. आपल्यासोबत एखादी समस्या निर्माण झाल्यास आई वडील, शिक्षक, पोलिसांशी शेअर करा. सामान्य माणसाला सुध्दा गुन्हेगाराला अटक करता येते” असे प्रतिपादन मा. श्री. विजय गोडसे साहेब (सहाय्यक पोलिस निरीक्षक, कराड शहर पोलिस स्टेशन, कराड) यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व शहर पोलिस स्टेशन, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्री. नंदकुमार बटाणे, सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विध्यानगर, कराड हे होते.
या कार्यक्रमात मा.श्री. आर. एस. पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक, कराड शहर पोलीस स्टेशन, कराड हे ही उपस्थित होते. ते म्हणाले मुलींवर फक्त शारीरक अटॅक होतो असे नाही तर भावनिक अटॅकही होतो. शुल्लक कारणासाठी मुली घरातून पळून जातात. विध्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्यांना मदत करणे हे पोलोसांचे काम आहे.
अध्यक्षस्थानी असलेले मा.श्री. नंदकुमार बटाणे साहेब म्हणाले की, ज्या ज्या वेळी महिलांवर अत्याचार होत असतील त्या त्या वेळी पोलीस पोहोचेपर्यंत आपलं स्वसंरक्षण करता आले पाहिजे यासाठी हे शिबीर आहे तसेच महिलांना स्फूर्ती देण्याचे काम या शिबिरामार्फत केले गेले. कॉलेजमध्ये शिक्षण देण्याबरोबरच इतर गोष्टीही राबवता आल्या पाहिजेत असे स्वर्गीय आदरणीय पी. डी. पाटीलसाहेबांना वाटायचे असेही ते म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक व प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय प्रा. डॉ. श्रीमती एम. ए. शिंदे यांनी केला तर प्रा. डॉ.श्रीमती व्ही. आर. लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. तर या कार्यक्रम प्रसंगी कु.तपस्या काशीद, कु. मानसी निकम, कु. राजश्री कुलकर्णी, कु. अनघा कुलकर्णी या विध्यर्थिनींनी मनोगते सादर केली .या कार्यक्रमात सहभागी शिबिरार्थीना प्रमाणात देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पोलिस हवालदार मा. श्रीमती हसीना मुजावर, मा. श्री सूर्यवंशी, श्री धीरज कोरडे, नंदिनी खेतमर (प्रशिक्षक), अभिषेक यादव (प्रशिक्षक) याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.