मायणी:-विद्यार्थी घडला तरच समाज घडेल – डॉ.एस.एन.पवार
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-विद्यार्थी घडला तरच समाज घडेल – डॉ.एस.एन.पवार

मायणी प्रतिनिधी
विद्यार्थी घडला तरच समाज घडेल असे उद्गार हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ कलेढोणचे अध्यक्ष डॉ.एस.एन.पवार यांनी संस्थेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना काढले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मिलिंद साळुंखे,संचालक संजीव साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते. पांडुरंग लोहार यांनी अहवाल सादर केला.संजीव साळुंखे यांनी यंदा१९नोव्हेंबरला समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची माहिती दिली. डॉ.पवार म्हणाले,विद्यार्थ्याच्या कल्याणातच शिक्षकाचे कल्याण असते. आदर्श विद्यार्थी घडवण्यात शिक्षकाचा वाटा असतो.विद्यार्थी संख्या कमी होणे ही चिंतेची बाब आहे,याचा विचार शिक्षकांनी करावा व आपल्या अध्यापनात अपेक्षित बदल करावा.जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप मिळवणारे पाहिजेत,त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याप्रसंगी गुलमहमद शिकलगार ,मालोजी कुंभार,रघुनाथ तोडकर,अनिल देशपांडे,पांडुरंग तारळेकर,विजय मिरासदार,राजाराम दबडे, बरकत शिकलगार, जुल्फान तांबोळी,हिराचंद बाबर व शिक्षक उपस्थित होते.मुख्याध्यापक श्रीमंत सानप यांनी प्रास्ताविक केले व पर्यवेक्षक प्रमोद लावंड यांनी आभार मानले.




