वाई:-बोलीभाषेतील वक्तृत्वच मनाला भिडते: चंद्रकांत कांबीरे
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई दि.14
बोलीभाषेतील वक्तृत्वच मनाला भिडते: चंद्रकांत कांबीरे

“आपण ज्या वातावरणात वाढलो, त्या वातावरणातील भाषा, त्यातले शब्द, बोलण्यातील सहजपणा या गोष्टी भावनांना हात घालतात. त्यामुळे बोलीभाषेतला संवाद हा जिवंत वाटतो, तर कृत्रिम अशा प्रमाणभाषेतला संवाद मनाशी जोडला जात नाही. त्यामुळे वक्त्याने आपल्या भाषेतच बोलायला हवे”, असे मत चंद्रकांत कांबीरे यांनी व्यक्त केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई द्वारा आयोजित कनिष्ठ महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते संवाद साधत होते. दिनांक ७ व ८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या देशभक्त आबासाहेब वीर शालेय वक्तृत्व स्पर्धेचे ५६ वे तर कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे हे ४६ वे वर्ष होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. श्रावण पवार, पर्यवेक्षक डॉ विलास खंडाईत हे उपस्थित होते.
श्री. कांबीरे पुढे म्हणाले, “भाषा टिकवण्याचे काम स्त्रियांनी केले आहे. त्या शेताशी, चुलीशी, झाडाशी, माणसांशी बोलतात. या संवादातून भाषा जपली जाते, वाढत राहते. आणि मराठीची अभिजात दर्जाच्या मागील सर्वांत महत्वाचे कारण तर संतसाहित्य हेच आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.” या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील ८० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शालेय स्पर्धांमध्ये प्रा. मंदा पवार व श्री सुमित वाघमारे यांनी ५ वी ते ७ वी गटासाठी, प्रा. संतोष दोरके व प्रा. जितेंद्र चौगुले यांनी ८ वी ते १० वी गटासाठी तर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धांसाठी प्रा. पंकज बोबडे आणि प्रा. राजेंद्रकुमार निकम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेनिमित्त मा. चंद्रकांत इंगवले, मा. दिलीप भोसले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, “वक्तृत्व ही कला आहे, पण ते साधनही आहे. या साधनाचा उत्तम वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य घडवताना समाजाचीही सेवा होईल, असे प्रयत्न करावेत.” याप्रसंगी स्पर्धेचा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेचा निकाल:
इ. ५ वी ते ७ वी गट :
प्रथम – प्रगती ताटे (ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय, शिरवळ)
द्वितीय – शिवराज धायगुडे (त. ल. जोशी विद्यालय, वाई)
तृतीय – अक्षदा धनावडे (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज)
चतुर्थ – श्रेयांशी शिंदे (कमलाबाई जोशी केंजळ विद्यालय, केंजळ)
पाचवा – ज्ञानश्री सूर्यवंशी (कमलाबाई जोशी केंजळ विद्यालय, केंजळ)
इ. ८ वी ते १० वी गट:
प्रथम – युगा गायकवाड (त. ल. जोशी विद्यालय, वाई)
द्वितीय – मृणाल चव्हाण (ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय, शिरवळ)
तृतीय – ईश्वरी शिवथरे (कन्या शाळा, वाई)
चतुर्थ – वेदराज अनपट (त. ल. जोशी विद्यालय, वाई)
पाचवा – समीक्षा बोडरे (कमलाबाई जोशी केंजळ विद्यालय, केंजळ)
कनिष्ठ महाविद्यालयीन गट
प्रथम – प्रज्ञा कुंभार (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा)
द्वितीय – श्रेया जाधव (किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई)
तृतीय – स्नेहा थोरात (यशवंतराव चव्हाण कॉलेज, कराड)
चतुर्थ – ईश्वरी सूर्यवंशी (किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई)
पाचवा – साक्षी चव्हाण (ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स व कॉमर्स, रहिमतपूर)
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धा समन्वयक श्रीमती नयना मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. श्री. दत्तात्रय शिंदे यांनी स्पर्धेचे नियम समजावून दिले. श्रीमती कोमल निकम यांनी पाहुण्यांचा व परीक्षकांचा परिचय दिला. श्री. पराग डोंगळे यांनी निकालाचे वाचन केले. श्री. सतीश तावरे व श्रीमती स्वप्नगंधा जाधव यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. श्री. राजन करपे यांनी आभार मानले. अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. श्रावण पवार आणि पर्यवेक्षक डॉ. विलास खंडाईत यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा निकोप व उत्साही वातावरणात पार पडली.




