पारनेर:-अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरातांची जवळीक चर्चेत! ; पारनेरमध्ये राहुल पाटील शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरातांची जवळीक चर्चेत! ; पारनेरमध्ये राहुल पाटील शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा.

राजकीय घराणेशाहीला आव्हान मिळणार का? सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत शेतकरीहिताचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याची मागणी.
पारनेर |राजकुमार इकडे(पारनेर तालुका माहिती सेवा समिती)
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार, विखे आणि थोरात या राजकीय घराण्यांचा प्रभाव दीर्घकाळापासून चर्चेत राहिला आहे. राजकीय संघर्ष, सत्तेची समीकरणे आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्व यांमुळे या घराण्यांच्या भूमिकांकडे राज्याचे लक्ष असते. मात्र, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय विरोध बाजूला ठेवून काही शक्ती एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले, तर त्यामागील राजकीय गणिते काय आहेत, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
राजकीय वैर बाजूला, मग नेमके गणित काय?
विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी लक्षात घेता, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्याशी संबंधित राजकीय गटांच्या भूमिकांची चर्चा महत्त्वाची ठरते. राजकारणात कोण कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हटले जाते; मात्र सहकार क्षेत्रातील निवडणुकीत होणाऱ्या राजकीय जुळवाजुळवीचा फायदा नेमका कोणाला होणार आणि त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे.
राजकीय समीकरणे जुळवताना शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा बँक ही केवळ राजकीय प्रतिष्ठेची जागा नसून शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित महत्त्वाची संस्था आहे.




