कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोणी:-मंत्री विखे पाटील यांच्या सूचनेनंतर पशुसंवर्धन विभागाचा आराखडा.

पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 लोणी:-मंत्री विखे पाटील यांच्या सूचनेनंतर पशुसंवर्धन विभागाचा आराखडा.

लोणी दि.१२

टंचाई परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय सव्हेक्षण सुरू केले असून,जिल्ह्यातील ६४ हजार पशुपालकांकडे जावून पशुधनाची माहीती संकलित केली आहे.मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने टंचाईच्या परीस्थीतीत चारा उत्पादनाचा “अहील्यानगर पॅटर्न” तयार होणार असून,चारा उत्पादनाचे नियोजन टंचाईच्या परीस्थीतीत पशुधनासाठी मोठा आधार ठरणार आहे.

जिल्ह्यात पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात जावून टंचाई आढावा बैठका घेतल्या.यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील चारा टंचाईच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. पशुसंवर्धन विभागाकडे असलेली पशुधनाची आकडेवारी,चारा उत्पादनाचे नियोजन आणि बियाणे वाटपात ढासळलेले नियोजन याचे गांभिर्य लक्षात घेवून विभागाला तालुका निहाय स्वतंत्र आरखडा तयार करण्याच्या सूचना प्रत्येक बैठकीत दिल्या होत्या.

प्रत्येक तालुक्यात असलेली पशुपालकांची संख्या,पशुधनाची संख्या,चारा उत्पादन करणारे शेतकरी,चारा मिळावा म्हणून मागणी करणारे शेतकरी आणि शासानाच्या योजनेनूसार मोफत बियाणे घेवून चारा उत्पादन करण्यासाठी तयार असलेल्या शेतकऱ्यांची माहीती संकलित करण्यासाठी मंत्री डॉ विखे पाटील यांच्या संकल्पनेतून एक प्रारूप तयार करण्यात आले आहे.

पावसाअभावी यावर्षी चारपीक धोक्यात आली आहे.त्यामुळे टंचाईच्या परीस्थीतीत पशुधनावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.यासाठी चारा उत्पादनावर प्रशासकीय यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रीत करावे आशा सूचना पालकमंत्री ना विखे पाटील यांंनी वेळोवेळी प्रशासनला दिल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागातील सर्व वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यात याबबातचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे.अहील्यानगर जिल्हा दूध उत्पादनामध्ये सर्वात मोठा जिल्हा ओळखला जातो.पशुधनाची संख्या मोठी असून त्यादृष्टीने करण्यात येत असलेले चारा उपलब्धतेचे नियोजन टंचाईच्या सर्व परीस्थितीत दिलासा देणारे ठरणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुधनाची गणना यापुर्वी करुन टॅगिंग करण्यात आले. जनावारांच्या नोंदी अचूकपणे झाल्या आहेत.नव्या सव्हेक्षणात पुन्हा पडताळणी होत असल्याने पशुधनाची नेमकी आकडेवारी,चारा मागणी आणि पशुधनाच्या दृष्टीने भविष्यातील नियोजन गांभिर्याने होत आहे.

कोट
चारा उत्पादनासाठी हायड्रोफोनिक्सचा उपयोग प्रशासानाने करावा ही आग्रही भूमिका पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.टंचाई आढावा बैठकीत सर्वच ठिकाणी याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.पशुसंवर्धन विभागाने प्रायोगिक तत्वावर याची सुरूवात करावी आवश्यक सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button