आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-‘धर्म, संस्कृती आणि अस्मितेचा जागर’ — वाईत विराट हिंदू संमेलनाचा रणशिंग फुंकला!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-‘शेतीत तंत्रज्ञानाची नवी कास’ — वाईत खरीप हंगाम प्रशिक्षणाचा प्रभावी जागर!

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई : येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्यांना थेट भिडण्यासाठी आणि आधुनिक शेतीचा मार्ग खुला करण्यासाठी वाई तालुक्यात कृषी विभागाने पुढाकार घेत तालुका स्तरीय प्रशिक्षण उत्साहात पार पाडले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वाई यांच्या वतीने कडेगाव येथील कृषी चिकित्सालयात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचे तत्काळ निराकरण करून त्यांना योग्य आणि शास्त्रीय मार्गदर्शन देणे हा होता. यासाठी कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान व पद्धतींचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी, वाई श्री. संतोष कुमार बरकडे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांचे गट तयार करून विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये बीबीएफ यंत्राचा वापर व त्याची सखोल माहिती, भात रोपवाटिका तयार करण्याची पद्धत, माती नमुना संकलन, मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन, उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया तसेच हुमणी नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार AI ॲप’ची माहिती पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आली. तसेच आपत्कालीन पीक नियोजनाबाबतही सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री. हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले. अध्यक्षीय भाषणात श्री. संतोष कुमार बरकडे यांनी अशा प्रशिक्षणांची आवश्यकता आणि त्यातून होणारे फायदे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळ कृषी अधिकारी श्री. रवींद्र बेलदार यांनी आभार मानले.
या प्रशिक्षणामुळे वाई तालुक्यातील कृषी यंत्रणा अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांना वेळेवर आणि अचूक मार्गदर्शन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

2) वाई:-‘धर्म, संस्कृती आणि अस्मितेचा जागर’ — वाईत विराट हिंदू संमेलनाचा रणशिंग फुंकला!

वाई : संत-समर्थांच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा धर्मजागृतीचा जाज्वल्य इतिहास घडविण्याची तयारी सुरू झाली आहे. हिंदू एकता, धर्मसंरक्षण आणि संस्कृतीच्या अभेद्य किल्ल्याला बळकटी देण्यासाठी वाई नगरीत ‘विराट हिंदू संमेलन’चे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
सकल हिंदू समाज, वाई शहर यांच्या वतीने आयोजित हे भव्य संमेलन शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता धर्मपुरी येथील साठेमंगल कार्यालयात पार पडणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यात कराडचे अभ्यासू वक्ते श्री. विजयाराव जोशी, साताऱ्याच्या प्रा. सौ. भक्ती दीपक डाफळे तसेच धर्मसंस्कृतीचे अधिष्ठाता प.पू. १०८ महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी विचारांतून हिंदू समाजाला एकतेची नवी दिशा आणि संस्कृती रक्षणाची प्रेरणा मिळणार आहे.
सदियोंपासून चालत आलेल्या परंपरा, संस्कार आणि श्रद्धेच्या ज्योती अधिक प्रखर करण्याचा निर्धार या संमेलनातून व्यक्त होणार असून, सामाजिक ऐक्याचा अभेद्य दुर्ग उभारण्याचा संदेश दिला जाणार आहे.
या विराट संमेलनात वाई शहरासह परिसरातील सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मरक्षणाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे जाहीर आवाहन आयोजकांनी केले आहे.

3) कराड:- “महापुरुषांचे विचारच परिवर्तनाचा खरा मार्ग” – कराडमध्ये डॉ. राजश्री तुडयेकर यांचे ठाम प्रतिपादन.

कराड, दि. २० : कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक येथे स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच संवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री ॲग्रीवेंचर कंपनीच्या एम.डी. डॉ. राजश्री तुडयेकर होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की, “महापुरुषांचे विचार हाच समाज परिवर्तनाचा खरा राजमार्ग आहे. देशाला योग्य दिशा देणारे विचार हे केवळ महापुरुषांकडूनच मिळतात, आणि त्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य फाउंडेशन करत आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष विजय दणाणे यांनी केले. यावेळी डॉ. विजय चांदणे, विद्याधर गायकवाड, प्रवीण भोसले, प्रा. बोडरे सर यांनीही आपल्या मनोगतातून सामाजिक समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून ‘रुबाब’ चित्रपटातील सहअभिनेत्री प्रतीक्षा जाधव तसेच ‘मीरा’ चित्रपटातील अभिनेत्री वैष्णवी काळे यांची उपस्थिती लाभली. याशिवाय ज्येष्ठ समाजसेवक राजाराम गुरव, राज्य सल्लागार सुनील फाटक, राज्य उपाध्यक्ष प्रतिश चोपडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश दणाणे, विजया माने, अनिल पोळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी कला, क्रीडा, कृषी, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे सल्लागार सुनील फाटक यांनी आभार प्रदर्शनाने झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button