आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड ओगलेवाडी यांच्यावतीने विद्यार्थी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

RPS STAR NEWS

माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड ओगलेवाडी यांच्यावतीने विद्यार्थी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

कराड :-आषाढी एकादशीचे औचित्य साधून सदाशिवगड हजारमाची ता. कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड ओगलेवाडी यांच्यावतीने विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीमधील पालखी,ज्ञानेश्वरी,संत तुकाराम महाराज ग्रंथाचे पूजन संस्था सचिव ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केले. यावेळी ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य,तसेच संस्थाचालक श्री. राजेंद्र काटवटे उपस्थित होते यावेळी संस्थेचे सचिव, संचालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे गोड कौतुक केले. दिंडीमध्ये वेशभूषेतील विठ्ठल ,रुक्मिणी यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच वारकरी वेशातील लहान मुले मध्यभागी पालखी भगव्या पताका टाळ मृदंग वाजवत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या जयघोषात विठू नामाचा गजर अशा वातारणामध्ये दिंडी सोहळा रंगला.
या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्यावतीने वतीने नियोजन मुख्याध्यापिका सौ. मनिषा पानवळ यांनी केले. दिंडी सोहळ्याचे स्वागत ठिक ठिकाणी महिलांनी औक्षण केले. विद्यालयाच्या प्रांगणात व जोतिबा मंदिरा समोर रिंगण सोहळा रंगला.झिम्मा फुगडी हे खेळ मुली खेळल्या. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जाधव ए.ए.,राजमाने टी .आर,वेताळ एस. डी.आपिने आर. एम.सौ शिनगारे एस.एस ,गोसावी एस.पी. सौ पोळ एस. एम.,पाटील ए ए आदी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी डुबल सी.डी.व रांगोले ओ .पी.व व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांचे योगदान लाभले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button