ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा :-केंद्रीय मंत्री गडकरी यांना अभिजीत बिचुकलेंचा सातारा कंदीपेढ्याचा नजराणा.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

केंद्रीय मंत्री गडकरी यांना अभिजीत बिचुकलेंचा सातारा कंदीपेढ्याचा नजराणा.

सातारा दि: सातारा हा अजिंक्य आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये अजिंक्यतारा किल्ला व त्याचा नावलौकिक जगभर पसरला आहे.ही सातारची ओळख असून दुसरी ओळख म्हणजे सातारचे कंदी पेढे. या कंदीपेढ्याला सेलिब्रिटी बनवण्याचे काम सुप्रसिद्ध कलावंत अभिजीत बिचुकले यांनी केले. या सातारा कंदीपेढ्याचा नजराणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला. त्यामुळे सातारा पेढे आता छत्रपतींची राजधानी ते देशाच्या राजधानी पर्यंत पोहोचल्याचे मानले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेकांनी आपले साम्राज्य उभे केले आहे .आपल्या अभिजीत कलाकृतीमुळे मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी कर्तबगारी अनेकांनी केली आहे. त्यामध्ये सातारच्या मातीतील तरुण पिढीचा नायक अभिजीत बिचुकले यांनी गॉडफादर नसतानाही स्वतःची स्टाईल निर्माण केली आहे. स्वतःचे नशीब स्वतःच निर्माण केले आहे.
थोडक्यात नमूद करायचं म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशी मनाशी खुणगाठ बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अपेक्षित असलेले हक्क मिळवणारी व्यक्ती म्हणजे अभिजीत बिचुकले होय.आपल्या कलागुणाने सर्व दूर कीर्ती पसरलेल्या अभिजीत बिचुकले यांनी उद्योग व्यवसायातही दमदार पदार्पण केले असून पुणे सारख्या विद्येच्या माहेर घरामध्ये आता सातारच्या कंदी पेढे विक्रीचे त्यांनी अभिजित बिचुकले अँड सन्स हे मोठे दालन उभे केले आहे. आज खऱ्या अर्थाने सातारच्या कंदी पेढ्याला सेलिब्रिटी बनवण्याचे काम अभिजीत बिचुकले यांच्या माध्यमातून होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. मोठमोठे सेलिब्रिटी जेव्हा पुण्यामध्ये भेट देतात त्यावेळी ते आवर्जून कवी मनाचे नेते बिचुकले यांच्या कडून सातारचे कंदी पेढे खरेदी करतात. या कंदी पेढा चव आणि त्याचा गोडवा अनेकांना भुरळ पाडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबतच भारतातील अनेक सेलिब्रिटी, भक्त तसेच राजकारण, समाजकारण, उद्योग, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिजीत बिचुकले यांच्या कंदीपेढ्यांचा आस्वाद घेतलेला आहे. तसेच सात समुद्र पलीकडे कंदी पेढ्याचे नाव पोहोचवलेले आहे.
त्यांचा सार्थ अभिमान पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना होत आहे. मराठी चित्रपट ‘सांगते ऐका’ मध्ये बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला ही गाणे प्रसिद्ध झाले.तीच बुगडी आता कंदी पेढ्याच्या माध्यमातून प्रसिद्ध पावली आहे. हे आता युवा पिढीला समजू लागले आहे. या त्यांच्या कर्तबदारीला त्यांचे बालमित्र डॅनियल खुडे व उद्योजक , कलावंत, सामाजिक कार्यकर्ते व अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
_______________________________________

फोटो – उद्योजक व कलावंत अभिजीत बिचुकले यांच्या कडून सातारा कंदी पेढे घेताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,,,,

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button