ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे चिंचवड:-2024ला चिंचवडचा आमदार राष्ट्रवादीचाच असण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

2024ला चिंचवडचा आमदार राष्ट्रवादीचाच असण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
चिंचवड, दि. 10 (शफिक शेख) :- नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीनंतर काल महाविकास आघाडीच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी येणा-या २०२४च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचाच होईल, असा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेल्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने थेरगाव येथे गुरुवारी (दि.९) आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी मोठी ताकद उभी केली होती. जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराप्रती दाखविलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जावू देणार नाही, जनतेने दाखविलेला विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच ऋणी राहू, मात्र जनतेचे आभार मानणे हे देखील महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे, असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवाराने व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी केले. यावेळी नरेंद्र बनसोडे, प्रवीण कदम, अजितभाऊ गव्हाणे, गौतम चाबुकस्वार, सुनिल गव्हाणे, रविकांत वर्पे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सर्व उपस्थितांचे व मतदारांचे आभार मानले. प्रविण कदम, कविताताई आल्हाट, विजय ओव्हाळ, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, संतोष कोकणे, माई काटे, माया बारणे, शितलताई काटे, उषाताई वाघेरे, उषाताई काळे, निकिता कदम, संगिताताई ताम्हाणे, राजेद्र साळुंखे, हरीभाऊ तिकोणे, ईम्रान शेख, फजल शेख, युनुस कुरेशी, प्रकाश जाधव, काशिनाथ नखाते, हरेश नखाते, माऊली सुर्यवंशी, विजय दर्शिले, संदीप पवार, रोमी संधू,सागर कोकणे, शाम जगताप, तानाजी जवळकर, सचिन काळे, देवा नखाते सर्व आजी माजी पदाधिकारी, निरिक्षक, महिला पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button