वडूज:-डॉक्टर प्रसन्न भंडारे यांचे अपघाती निधन वडूज शहरावर शोककळा.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
डॉक्टर प्रसन्न भंडारे यांचे अपघाती निधन वडूज शहरावर शोककळा, मायणी प्रतिनिधी__मायणी मेडिकल कॉलेजचे प्रतीतथ यश डॉक्टर प्रसन्न किशोर भंडारे वय वर्ष 35 ही मायणी वरून वडूज कडे येत असताना MH11BV9074 धोंडेवाडी जवळील पुलावरून खाली जाऊन झाडाला धडक दिल्याने डॉक्टर प्रसन्न भंडारे यांचे जागीच निधन झाले याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर भंडारे हे अकरा वाजता मायणी कडुन वडूज कडे जात होते धोंडेवाडी जवळच्या फुलाजवळ त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पुलाला धडकून फुलाच्या खाली असणाऱ्या बाभळीच्या झाडाला धडक दिल्याने गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे व गाडीत असलेले डॉक्टर प्रसन्न भंडारे यांच्या छातीला पोटाला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला त्यामुळे वडूज मायणी परिसरावर शोककळा पसरली डॉक्टर किशोर भंडारे हे वडूज येथील प्रतीतथ यश डॉक्टर असून माऊली क्लिनिक म्हणून त्यांचा दवाखाना प्रसिद्ध आहे त्यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिले पण त्यांचा मुलगा नियतीने हिरावून घेतला याला म्हणतात नियतीचा खेळ सदर घटनेची नोंद मायनी पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस सहाय्यक फौजदार शितल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नाना कारंडे अधिक तपास करीत आहेत