फलटण:-सामाजिक उपक्रमातून जेष्ठ नागरिक आनंद घेत आहेत डॉ सई खराडे.
प्रतिनिधी:-आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
सामाजिक उपक्रमातून जेष्ठ नागरिक आनंद घेत आहेत डॉ सई खराडे.
फलटण-
एका बाजूला वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या जेष्ठ महिला व दुसऱ्या बाजूला नवजात बालक यांच्यासाठी काम करणाऱ्या जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले पाहिजे सामाजिक व आरोग्याच्या उपक्रमातून जेष्ठ नागरिक जगण्याचा एक वेगळा आनंद घेत आहेत असे मत जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिन व बाल आरोग्य शिबिराच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना बाल रोगतज्ज्ञ डॉ सई खराडे यांनी प्रकट केले मलटन येथे व्यक्त केले
मलटण ता फलटण येथील सद्गुरू हरिबाबा महाराज जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून मलटण व परिसरातील वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या कर्तृत्ववान पंचवीस महिलांचा सत्कार या वेळी करण्यात आला त्याच बरोबर जेष्ठ नागरिक संघा तर्फे बाल आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते या मध्ये मलटण व परिसरातून असंख्य बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली
या वेळी माजी नगरसेविका प्रा उज्वला शिंदे ,विलास इंगळे रवींद्र माने सुरेश पवार कृष्णाथ नेवसे राजन भोसले कादरभाई पठाण सौ पठाण सर्व संचालक व सदस्य