वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तर्फे दिवाळी फराळाचे गरजूंना वाटप.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तर्फे दिवाळी निमित्त दिवाळी पाडव्याच्या दिवशी सिद्धनाथवाडी तील कृष्णा नदीपात्रात झोपडी करून रहाणारे बेघर गरीब नागरिकांना लाडू, चिवडा, चकली, करंजी असे फराळ पॅकेट वाटप करण्यात आले. या लोकांना सुद्धा दिवाळी सण साजरा करण्याचा हक्क असतो पण परिस्थितीमुळे हे लोक मिष्टान्न बनवू शकत नाहीत,नागरिकांच्या हक्कांच्या कर्तव्यास जागून अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई यांनी या नागरिकांची दिवाळी गोड केली. या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुका अध्यक्ष श्री.सतीश जेबले, संघटक श्री राहुल जायगुडे, प्रसिध्दी प्रमुख सौ. मानसी पटवर्धन, जेष्ठ सदस्य श्री विनायक पवार, तसेच ग्राहक पंचायत चे नवनियुक्त सदस्य श्री.सचिन नवघणे, श्री रोहित सुतार, श्री संदीप नवघणे, श्री कल्पेश जायगुडे, श्री लक्ष्मण घाडगे यांची उपस्थिती होती.