ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मावळ:-दीड दिवसाच्या गणपतीला मावळात ढोलताशाच्या गजरात भावपूर्ण निरोप.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

दीड दिवसाच्या गणपतीला मावळात ढोलताशाच्या गजरात भावपूर्ण निरोप.
पवनानगर- घरगुती दीड दिवसाच्या गणपतीला मावळात मंगलमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
दोन वर्षा नंतर कोरोना चे सर्व निर्बंध शिथिल झाल्याने या वर्षी अत्यंत आनंदात, उत्साहात ढोलताशांच्या गजरात मिरवणूका काढून गणरायाचे आगमन झाल्याचे सर्वत्र बघायला मिळाले. दीड दिवस गणपतीची मनोभावे पूजा कण्यात आली तसेच भजन, जागर, फेर धरून गौरीची गाणी आणि विविध पारंपारिक कला सदर करून गणेश उत्सव साजरा होत असल्याचे काही गावांमध्ये पहायला मिळाले. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दंगून गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पुणे मुबई सारख्या विविध मोठ्या शहरांमध्ये उदरनिर्वाहासाठी गेलेले सर्व लोक गावात परत आल्याने गावांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. ठाकुरसाई, गेव्हंडे खडक, मोरवे चावसार शिळीब अजिवली या परिसरातील गणपती पवनाधरण काठी तर काले, पवनानगर, कोथूर्ण, या नधी किनारील गावातील गणपतींचे विसर्जन पवना नदी तीरावर करण्यात आले. मावळ परिसरात ढोल पथक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि या ढोल पथकांना मुंबई पुणे येथे प्रचंड पसंती व मागणी असल्याने तरुण वर्ग गणपती मिरवणुकांसाठी मुंबई पुण्याला जात आसतो. त्यामुळे तरुणांचे प्रमाण कमी असल्याचे बघायला मिळाले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button