ताज्या घडामोडी

मेढा:-गद्दारांची शिवसेना होऊच देणार नाही हे सेना प्रमुखांनी नक्कीच म्हटले असते – सादिक बागवान

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

गद्दारांची शिवसेना होऊच देणार नाही हे सेना प्रमुखांनी नक्कीच म्हटले असते
– सादिक बागवान

मेढा दि: स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी भाग घेतला. ते सर्व स्वातंत्र्य सैनिक हे काँग्रेस विचारधारायचे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सेनानी यांच्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदर होता. परंतु, अलीकडच्या काळात शिवसेनेची पाऊले योग्य दिशेने चाललेले आहेत. काहीजण गद्दारी करून महाराष्ट्र गुजरातला विकण्यास नादी लागलेल्या प्रवृत्तीच्या नादी लागलेले आहेत. अशा शिवसेनेशी गद्दार भाजप होऊ दे पण शिवसेना गद्दारांची कदापि होऊ देणार नाही. असं नक्कीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले असते. असे प्रतिपादन ज्येष्ठ शिवसैनिक व सातारा जावळी विधानसभा संघटक सादिक अली बागवान यांनी मेढा ता. जावळी येथे झालेल्या शिवसैनिकांच्या निर्धार प्रचार यात्रेत केले.
सध्या मोठ्या प्रमाणात खोके वसुली केल्यामुळे दस्तुरखुद मुख्यमंत्री व त्यांची मंत्रिमंडळातील वसुली सैनिक भाजपची तळी उचलत आहेत. त्यांना शिवसेना या चार अक्षर नाव घेण्याची सुद्धा पात्रता नाही. त्यांनी निष्ठा म्हणजे थांबू नका. असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. हे आता सर्व महाराष्ट्राला परिचित झालेले आहे.
छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमित जी कदम यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे . सध्या सातारा शहर व परिसरात तसेच जावळीत दहशतीच्या कारखान्यातून सामान्य माणसांच्या विचारांचे गाळप केले जात आहे.
शिवसेनेच्या मशाल चिन्हाने वातावरण निर्मितीने विकास आघाडीमध्ये चैतन्य निर्माण केलेले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस एकादिलाने व एका जिवाने प्रचार यंत्रणा सक्षमरीत्या राबवत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून शिवसैनिकांनी शपथ घेतली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवला होता. आज मशाल चिन्हाचे एक नंबरचे बटन दाबून आपल्याला ही गद्दारांना धडा शिकवायचा आहे. त्याचबरोबर गद्दारांच्या सोबत असणाऱ्या सोन्याची पळी घेवून आपल्याच ताटात मटण वाढून घेणाऱ्यांना ठेकेदारांच्या मसिहाला धडा शिकवायचे आहे. असेही बागवान यांनी स्पष्ट केले.
या वेळी विक्रम फडतरे,निलेश धनवडे, जाहीर पठाण, मुन्ना मुल्ला, शकील सय्यद, मुसा शेख व आप्पासाहेब गावडे, संदीप सावंत, प्रकाश सपकाळ ,दादासाहेब रांजणे, विकास चिकणे, महादेव भिलारे, विजया गायकवाड, शिवा गावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मेढा ,करहर, कुडाळ, विवर, कावडी, शेते, हुमगाव, सायगाव, महिगाव, आनेवाडी, मोरघर परिसरात दिनांक २० नोव्हेंबर रोजी मशाल चिन्हाचे बटन दाबून मतदार आपले कर्तव्य पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

फोटो – मशाल चिन्ह घेवून प्रचार करताना शिवसैनिक व कार्यकर्ते (छाया – प्रशांत जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button