ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“थोडेसे मायबाप” या संकल्पने अंतर्गत “ज्येष्ठ नागरिक कक्षचे उद्घाटन (चोरवाघलगाव) वैजापूर तालुका

प्रतिनिधि:- सचिन मोईन औरंगाबाद

वैजापुर तालुक्यातील चोरवाघलगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत *”थोडेसे मायबाप”* ह्या संकल्पने अंतर्गत आज दिंनाक 21 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास *”जेष्ठ नागरीक कक्ष”* रेबीण कापुन कक्ष सुरु करण्यात आले.तसेच उपस्थित असलेल्या सर्व जेष्ठांचा शाल व खजुर पाकीट देऊन सन्मान करण्यात आला. या निमित्ताने आरोग्य केंद्र गाडे पिंपळगाव येथिल आरोग्य कर्मचारी व डाँक्टर यांनी उपस्थित असलेल्या जेष्ठ महिला व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सुरु करण्यात आलेल्या कक्षामध्ये नियमीत वाचनासाठी विविध दैनीक न्युज पेपर सुरू करण्यात आले असून ह्या उपक्रमाबद्दल जेष्ठांनी ग्रामपंचायत कमिटीला आशिर्वाद देऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामसेविका सौ कविता भुजाडे यांनी सर्व जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच श्री कैलास सातपुते उपसरपंच , श्री दादासाहेब पा मोईन सर्व ग्रा.प.सदस्य , सोसायटी चेअरमन गावातील जेष्ठ नागरिक आरोग्यसेवक डॉक्टर,कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button