आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण कडून फलटण येथे पार पडले महास्वच्छता अभियान.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण कडून फलटण येथे पार पडले महास्वच्छता अभियान.
फलटण :
श्री सदस्यांनी अफलातून काम करत फलटण शहर व शासकीय कार्यालये ज्या पद्धतीने साफ केली त्यातून संस्कृतीचे दर्शन होते .इतक्या शिस्तबद्धपणे केलेले स्वच्छता अभियान फलटण मध्ये आज वर झाले नसावे स्वयंपूर्तीने सहभागी झालेल्या सर्व श्री सदस्यांचे आभार त्यांनी स्वच्छतेची दिलेली शिकवण प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करावी असे मार्गर्शन डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा व फलटण नगरपरिषद फलटण आयोजित महास्वच्छता अभियानाच्या समारोप प्रसंगी मा उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप यांनी केले महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी पूर्ती निमित्त पद्मश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात पार पडले सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले हे स्वच्छता अभियान दुपारी अकरा वाजेपर्यंत सुरू होते .
या वेळी मा तहसिलदार फलटण फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेल्या या आभियानात दोन हजार श्री सदस्यांनी सहभाग घेतला यावेळी तब्बल बारा ट्रॅक्टर व सोळा घंटागाडी अभियानात सामील झाल्या होत्या सकाळी लवकर सुरू झालेले स्वच्छता अभियानात फलटण नगरपालिका कर्मचारी मा तहसिल कार्यालय मधील कर्मचारी व अधिकारी मा उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी तसेच फलटण मधील नागरिक सहभागी झाले होते.
अवघ्या काही तासात फलटण मधील स्वामी विवेकानंद नगर ,फलटण न्यायालय ,फलटण पोलिस वसाहत ,बाणगंगा नदीकाठावर असणारा दत्तघाट तहसिल व प्रांत कार्यालय परिसर श्री सेवकांनी झाडून अगदी स्वच्छ केला या अभियानात तब्बल २०० टन कचरा उचलण्यात आला काही ठिकाणी तुंबलेली गटारे ही श्री सदस्यांनी साफ केली फलटणचे नागरिक झोपेत असतानाच स्वच्छ झालेले फलटण पाहून नागरिक अवाक झाले होते रोज पहातो ते फलटण हेच का असेही काही नागरिक म्हणत होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button