आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे निगडी:-आरपीएस स्टार न्यूज’चा दणका 24 तासांच्या आत यमुनानगर हॉस्पिटल येथील धोकादायक खड्डे दुरूस्त.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

‘आरपीएस स्टार न्यूज’चा दणका
24 तासांच्या आत यमुनानगर हॉस्पिटल
येथील धोकादायक खड्डे दुरूस्त.
निगडी, दि. 05 (शफिक शेख):- सेक्टर नंबर 22 निगडी ओटा स्किम येथील यमुनानगर शासकिय रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठया प्रमाणात धोकादायक खड्डे पडले होते. मागील अनेक महिन्यांपासून अनेक तक्रारी देवूनही कारवाई होत नसल्याने रूग्णालयात येणा-या गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध रूग्ण आणि लहान बालके यांना त्रास सहन करावा लागत होता. आरपीएस स्टार न्यूज ने याबाबत पुढाकार घेवून स्थापत्य विभागात पाठपुरावा करून केवळ 24 तासांमध्ये सदर धोकादायक खड्डयांची दुरूस्ती करवून घेतली. या कामात प्रा. उत्तम केंदळे यांचे सहकार्य लाभले. या खड्डयांची दुरूस्ती झाल्याने परिसरातील नागरिकांनी आरपीएस स्टार न्यूज चे आभार मानले आहेत.
याबाबत आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांनी स्थापत्य विभागाचे अभियंता श्री. काळे यांना पाठपुरावा करून सदर खड्डे आणि त्यामुळे भविष्यात होणा-या जीवितहानी विषयी त्यांना कल्पना दिली आणि त्यामुळे त्यांच्यावर होणा-या कारवाईचीही जाणीव करून दिली. त्यामुळे सदर घटनेचे गांभिर्य ओळखत श्री. काळे यांनी त्वरित 24 तासांत अभियंते पाठवून पाहणी केली आणि सदर खड्डे पूर्णपणे दुरूस्त केले. या संपूर्ण कामात माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button