भुसावळ येथे नमो युवा रन उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भुसावळ येथे नमो युवा रन उत्साहात संपन्न.

(भुसावळ झाले नमो मय) भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नशा मुक्त भारतासाठी मॅरेथॉन २०२५ नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चार गट करण्यात आले होते खुला पुरुषांचा गट, खुला महिलांचा गट, शालेय मुलांचा गट ,शालेय मुलींचा गट अशा चार गटांमध्ये युवा व युतींनी हजारोच्या संख्येने सहभाग नोंदवला होता. सदर नमो युवा रन चा मार्ग रेल्वे ग्राउंड भुसावळ ते हंबर्डीकर चौक ,लोखंडी पुलाखालून शिवाजी कॉम्प्लेक्स, पांडुरंग टॉकीज समोरून मोटुसोबराज चौक पर्यंत व तिथून त्याच मार्गाने परत रेल्वे मैदानावरती असा तीन किलोमीटरचा हा युवा नमो रन आयोजित करण्यात आला होता.

नमो रन चे उद्घाटन क्रीडा ज्योत पेटवून , बलून सोडून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी, मंडळ रेल प्रबंधक सुनील कुमार सुमन आर के मीना, चित्रेश जोशी, चंद्रकांत बाविस्कर केतकी पाटील , परीक्षित बऱ्हाटे, किरण कोलते संदीप सुरवाडे गिरीश महाजन अमोल महाजन जयंत माहूरगड प्रशांत पाटील, आनंद ठाकरे गोलू पाटील पवन बुंदिले, प्रमोद नेमाडे, अनिल वारके, पवन बुंदिले अनिरुद्ध कुलकर्णी जयंत माहूरकर, निखिल वायकोळे, गिरीश महाजन विनीत हंबर्डीकर, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, संकल्प वाणी खुशाल जोशी ,प्रवीण कर, प्रशांत पाटील, प्रशांत नरवाडे, तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात , क्रीडा व शा शि. शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ .प्रदीप साखरे , रमण भोळे, आधी उपस्थित होते. पुरुषांच्या खुल्या गटांमध्ये प्रतीक सोनवणे याने प्रथम क्रमांक मिळवला आदित्य जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर लकी खरारे ने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच महिलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक रेणुका धनगर हीणे पटकावला द्वितीय क्रमांक गायत्री माळी हिने पटकावला तर अश्विनी रोझोदे तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागेल. शालेय गटामध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक निलेश इंगळे यांनी पटकावला द्वितीय क्रमांक रोहित बावणे तृतीय क्रमांक योगेश शिरसाळे मिळवला शालेय गटातील मुलींमधून प्रथम क्रमांक पूर्वा बाविस्कर द्वितीय क्रमांक हर्षाली वाणी तर तृतीय क्रमांक राखी महाजन ने पटकावला. स्पर्धाधिकारी म्हणून डॉ.प्रदीप साखरे, विलास पाटील, मनोज वारके, मेघश्याम शिंदे, मुकेश मोरे, रवींद्र चोपडे, श्री निकम, गोपी सिंग, ममता जहांगीड , डॅनियल पवार, दत्तू अहिरे, विजय संकेत, अलीस्टर , चेतन जैन, आदींनी काम पाहिले यशस्वीतेसाठी परीक्षित बऱ्हाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी,डॉ .प्रदीप साखरे यांच्यासह. क्रीडा शिक्षक महासंघाचे पदाधिकारी, तालुका अथलेटिक्स असो., व रेल्वेच्या पदाधिकारी यांनी, तसेच गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमन भोळे, डॉ. प्रदीप साखरे यांनी केले.




