पुणे:-(पुनावळे)-शेतमजूर ,शेतकरी,वंचित , दलित आणि स्त्री पुरुष समानतेसाठी आयुष्भर काम करणारे फुले दाम्पत्य हे 18 व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे जनक होत – सत्यशोधक ढोक.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
शेतमजूर ,शेतकरी,वंचित , दलित आणि स्त्री पुरुष समानतेसाठी आयुष्भर काम करणारे फुले दाम्पत्य हे 18 व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे जनक होत – सत्यशोधक ढोक.
महात्मा दिनी फुले एज्युकेशन तर्फे पुनावळेत 14 वा.सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा संपन्न.
पुणे / पुनावळे- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन तर्फे सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांचे 137 व्या.महात्मा दिना निमित्त 11 मे 2025 रोजी दु.2 वा. महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने प्राईम सेनेटरी बिल्डिंग मधील 8 व्या.मजल्यावरील 806 नंबर प्लॅट चा सत्यशोधक गृहप्रवेश सोहळा पुनावळे, पुणे येथे महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती ,महाराष्ट्र शासनाचे सदस्य व संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभुषेत मोफत पार पाडला.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की फुले दाम्पत्य यांनी आपले पूर्ण आयुष्य शेतमजूर , शेतकरी, वंचित , दलित आणि स्त्री पुरुष समानतेसाठी अनेक संकटावर मात करीत अलौकिक असे सामाजिक काम केले व महिलांसाठी प्रथम शिक्षण सुरू केले. 18 व्या शतकातील जोतीराव फुले यांचे महान कार्य पाहून सयाजीराव गायकवाड महाराज यांचे मार्गदर्शनाखाली मुंबई कोळीवाडा येथे रघुनाथ सभागृहात जनतेने जनतेच्या दरबारात 11 मे 1888 रोजी महात्मा पदवी दिली तो आज सुवर्णदिन आहे असे म्हणत महात्मा गांधी यांनी देखील खरे महात्मा हे जोतीराव फुले आहेत असे गौरवोद्गार काढले होते असे देखील ढोक यांनी सांगितले. आणि जळगांव वरून पुणे येथे येऊन प्लॅट घेतला आणि त्याचा गृहप्रवेश सोहळा सत्यशोधक पद्धतीने पार पाडला तसेच ज्या पुणेकरांनी महात्मा फुले यांचे कार्य वारसा विचार पुढे कृतिशील पुढे नेणे अपेक्षित आहे त्या मानाने बाहेरून पुणे आलेली मंडळी वारसा पुढे नेत आहेत त्याबद्दल शेवाळे परिवाराचे अभिनंदन करीत आज सकाळी फलटण चे बनकर यांनी देखील आकुर्डी येथे सत्यशोधक पूजा आमचे संस्थेकडून करून घेतली असे देखील सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मान पत्र व संस्थेचे वतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो प्रेम आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले गीत चरित्र सौ.पुष्पांजली व प्रदीप शेवाळे आणि सौ.प्रतिक्षा व जयवंत शेवाळे यांना सत्यशोधक ढोक यांनी भेट दिले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला श्री. व सौ.पुष्पांजली प्रदीप शेवाळे यांचे शुभहस्ते प्लॅट चे दरवाजाला भव्य हार तोरण बांधण्यात आले तर सौ.प्रतिक्षा व जयवंत शेवाळे यांचे कडून विधीकार्य करून घेत त्यांचे कडून प्रतिज्ञा म्हणून घेतली.आणि त्यांचे शुभहस्ते सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार घालण्यात आले. श्री. व सौ.सरला बाबुलाल महाजन यांचे हस्ते राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले समग्र वाडमय ग्रंथाचे पूजन करण्यात आले.शेवटी पिंपरी चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ते लहू अनारसे (कर्जत) यांनी आभार मानले.